ज्याप्रमाणे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये विविध कारणांनी अनेकांवर अन्याय झाला (उदा. स्थायी आर्डर वेळेत मिळाली नाही , फार्म भरताना noc असूनही पती-पत्नी एकत्रीकरण मधून अर्ज भरला गेला, सर्वर डाऊन असल्याने अर्जच भरता आला नाही. ) त्याप्रमाणे आताही जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ज्यांना बदली हवी आहे त्यांना ही वरील अडचणी येऊ शकतात. सर्वर डाऊन चा प्राब्लेम तर येतच आहे.
या वर उपाय म्हणजे आपल्याला जी अडचण येते ती पटकन मेल करणे गरजेचे असते. व आपण तेथे कमी पडतो. तसेच आफलाईन अर्ज करणे ही महत्वाचे असते. आनलाईन आनलाईन म्हणून आपण आपल्याला येणाऱ्या अडचणी कागदावर मांडून पाठपुरावा करणे विसरून चाललो आहोत. व मेलही करत नाही. फक्त वाट्सअप व फोनवर बोलून गप्प बसतो. व नंतर तेलही गेले... तूपही गेले... ही परिस्थितिती उद्भवते. तरी खालील. बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
या वर उपाय म्हणजे आपल्याला जी अडचण येते ती पटकन मेल करणे गरजेचे असते. व आपण तेथे कमी पडतो. तसेच आफलाईन अर्ज करणे ही महत्वाचे असते. आनलाईन आनलाईन म्हणून आपण आपल्याला येणाऱ्या अडचणी कागदावर मांडून पाठपुरावा करणे विसरून चाललो आहोत. व मेलही करत नाही. फक्त वाट्सअप व फोनवर बोलून गप्प बसतो. व नंतर तेलही गेले... तूपही गेले... ही परिस्थितिती उद्भवते. तरी खालील. बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- लाॅगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांचा आहे तर आपल्याला बदली पाहिजे म्हणून आपण मुख्याध्यापकांना तसा कागदावर अर्ज करून 20 प्राधान्यक्रम भरून देणे व त्याची पोहोच घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आॅनलाईन मदत मुख्याध्यापकांना नक्कीच करूया. पण आॅनलाईन मध्ये येणाऱ्या अडचणी मुख्याध्यापकांच्या मेलवरूनच पाठविता येतात.तेच अधिक्रूत होय.
- आपले यादीत नाव आले नाही अगर कोणतीही वैयक्तिक अडचण आल्यास आपल्याला ती मांडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणजे कागदी अर्ज व पोहोच हीच आहेे हे विसरू नका.कारण अनेक शिक्षकांनी आपला अधिक्रूत मेल आयडी प्रशासनाला गोपनीय अहवाल वा यू डायस इ. माध्यमातून दिला नाही. तसेच मुख्याध्यापक के.प्र. ग.शि. यांचा मेल आयडी नियमित वाचला जात नाही. बी.आर.सी. चा काही प्रमाणात वाचला जातो. मात्र बदल्या मध्ये ते निर्णय घेऊ शकत नाही. असो कागदाला अजूनतरी पर्याय नाही.
- कोणताही अर्ज एकट्याने करण्यापेक्षा समान समस्या असणार्या 50 लोकांनी 50 सह्या करून एकत्रीतपणे करावे. व 50 पैकी एकट्याचा जरी अधिक्रूत मेल आयडी असेल तर इ मेल करून वरील कागदी अर्जाची प्रत अपलोड करावी व जितके प्रशासकीय मेल अड्रेस असतील त्या सर्वांना पाठवावे. हे काम अत्यंंत जलद करावे. कारण आनलाईन दुनियेत वेळेला खूप किंमत असते. आज करू उद्या करू चालत नाही. सेकंदावर कामे चालतात.
- आपण सरल वर काम करूनही केंद्र प्रमुख वेरीफिकेशन नसेल तर ट्रान्सफर पोर्टल वर काम चालत नाही. केंद्र प्रमुखांना पासवर्ड मागणे खरा तर गुन्हा असतो. त्यासाठी मुख्याध्यापकांनी के.प्र. कडे व शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडे कागदी पाठपुरावा करणे गरजेचे असते. शक्य असल्यास इ मेल करून फोन करावा. व त्यांच्या कडून मदतीची मागणी झाल्यास त्यांच्या लागीन वरून वेरिफिकेशन करून सरल चे काम करून घेता येईल. पण कायदेशीर पाहता कागदाला पर्याय नाही. कारण वेरिफिकेशन झाले नाही अगर ट्रान्सफर पोर्टल वर नाव दिसत नाही. हे शिक्षकाला कसे कळले हा प्रश्न येतो त्यांच्याकडे त्याबाबतचा लाॅगीन अगर पासवर्ड नाही.
- असो सदैव दर तासा तासाला अलर्ट राहा. जो अाळस करेल त्याचे काहीही ऐकून घेतले जाणार नाही. कारण प्राचीनयुग, अश्मयुग, मध्ययुग मंत्रयुग, यंत्रयुग संपून आता तंत्रयुग म्हणजेच संगणक युग सुरू झाले आहे.