Wednesday, November 11, 2015

बहुस्तरीय अध्यापन काळाची गरज

कोणत्याही वर्गात अध्यापन करीत असताना ज्या विद्यार्थ्यांना लवकर समजते ते लवकर पुढे जातात. व कमी वेगाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिकविताना हे हुशार विद्यार्थी दंगा करत अगर दुसरे काहीतरी अर्थहीन करत बसतात. ही एकस्तरी अध्यापनाची मर्यादा आहे.
येथे दोन प्रकारच्या मुलांचा विचार करूया अ गट ( हुशार विद्यार्थी ) , ब गट ( मध्यम विद्यार्थी)
  1. अ गटाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो कारण कमी वेगाच्या मुलांना सोबत घेऊन जाण्यासाठी शिक्षक जेव्हा पुनराध्यापन करतो त्यावेळी या अ गटातील हुशार विद्यार्थ्यांच्या जीवनातील बहुमुल्य वेळेचा हवा तेवढा सदुपयोग होत नाही. कारण ते हुशार असले तरी त्यांना त्यांच्या वेगाने शिक्षण मिळत नाही , व इतरांसाठी त्यांना थांबावे लागते. पण त्याचवेळी इतर देशातील (इतर ठिकाणची ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या वेगाप्रमाणे शिक्षण मिळते ) त्यांच्या बुद्धीमत्तेची मुले त्याच वेगाने पुढे निघून जातात. हा हुशार मुलांवर होणारा एक प्रकारचा अन्यायच आहे. कारण ते ही भारताचे नागरीक आहेत . शिक्षकांना जो पगार मिळतो तो प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार शिक्षण देण्यासाठी .
  2.  त्याचप्रमाणे जर अ गटाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वेगाप्रमाणे वेळ द्यायचा म्हटल्यास ब गटाचे विद्यार्थी मागे राहतील कारण त्यांना दोन वेळा मार्गदर्शन देण्याची गरज असते , नव्हे तो त्यांचा हक्कच आहे. कारण शिक्षण घेण्यासाठी व अडचणी दूर होण्यासाठी बालक शाळेेत येते.आणि त्याला हवे तेवढे मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळालेेच पाहिजे या मध्ये त्याच्या गतीनुसार त्याला शिकता आले पाहीजे.
  • यासाठी बहुस्तरीय अध्यापन ही काळाची गरज बनली आहेे. 
  • शिक्षकाला एकाच वेळी दोन वेगवेळे स्तरांवरील पाठ शिकविता आले पाहीजेत. (काही वेळा
    3,4 सुध्दा)
  • त्यासाठी शिक्षकांनी गट पध्दतीचा वापर करावा.
  • प्रत्येक गटाला मार्गदर्शन करताना इतर गटांच्या जीवनातील अध्ययन करण्याचा बहुमुल्य वेळ वाया जाऊ नये यासाठी इतर गटांना त्यांच्या गतीनुसार कामात (अध्ययनात) ठेवता आले पाहीजे.
  • यासाठी कृतियुक्त शै. साधने, कार्डे , संगणक , मोबाईल, अॅॅप्स, इ. साधने शिक्षकाला सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचा पुरेपुर वापर करून घ्यावा.
  • गटअध्यापन व विविध साधनांचा स्वतः वापर करून मुले शिकतात, व शिक्षकाला प्रत्येक गटातून मुले इतक्या शंका विचारतात कि फक्त त्यांच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी शिक्षकाला 11 ते 5 वेळ द्यावा लागतो. हेच ज्ञानरचनावादाचे मूळ आहे. व यातूनच मुले आपल्या गतीने शिकत जातात. 

यामुळे इथुन पुढे बहुस्तरीय अध्यापन हेच शिक्षकांच्या यशाचे रहस्य असणार आहे.

Friday, September 25, 2015

नापास करण्याच्या तरतुदी बाबत.

          शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये विद्यार्थ्याला नापास करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सरकार आत्ता नापास करण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहे. नापास करण्याच्या जुन्या पध्दतीला काही सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. म्हणून केंद्रानेे याबाबतीत राज्य सरकारांचे मत मागविले आहे. सदर ब्लाॅग मधून एक शिक्षक म्हणून मी माझे मत प्रदर्शित करत आहे.
         मुलास नापास करू नये या मताचा आदर करताना कोणताही शिक्षक खालील गोष्टींचा विचार करतो.
  1. नापास होणे ही मुलास अपमान कारक बाब असते. त्यामुळेे त्याचा अात्मविश्वास कमी होतो.
  2. त्यामुळे ती हळू हळू शाळा सोडून देतात.
  3. पास 0होण्यासाठी फक्त 40 टक्के किमान अध्ययन क्षमता अपेक्षित असतात, व त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जन्मसिद्ध असतातच.
  4. नापास करणे म्हणजे बालाकाला शिक्षा देण्यासारखे आहे.
  5. गुणवत्ता म्हणजे केवळ पाठ्यपुस्तके नव्हे , त्याचा परिघ खूप मोठा आहे. (1 ते 100 अंक वाचता न येणारा निरक्षरही मोठे हिशोब करतो मग त्या विद्यार्थ्याला त्या हिशोबाच्या क्षमता येत असणारच. इ.
            आत्ता मुलास कोणत्या परिस्थितीत नापास करणे योग्य व पास करणे कसे गुणवत्तेच्या दृष्टीने कसे तोट्याचे ठरते ते पाहू .
  1. आत्मविश्वास कमी होतो , अपमान होतो या कारणास्तव सत्याचा स्विकार केला नाही तर असत्य हेच सत्य आहे असे मुलास वाटू लागते. म्हणजे मुलाला तुला काय काय येत नाही याची जाणीव करून दिली नाही तर अजून त्याला किती प्रगती करायची आहे व तो जगाच्या तुलनेत कोठे आहे . हे समजणारच नाही. चूक समजल्याशिवाय त्यात सुधारणा होणे शक्य नसते. कारण आपण चुकीलाच बरोबर म्हणून मान्यता दिलेली असते.
  2. मुले नापास केल्यामुळे शाळा सोडून देतात यावर विचार केल्यास तितकेसे खरे वाटत नाही. कारण मुलाला जेव्हा आपल्याला शाळेत काही येत नाही असे वाटते तेव्हा त्याला शाळा सोडून येणारे दुसरे काहीतरी करावे असे वाटते. म्हणजेच मूल नापास होण्याने शाळा सोडत नाही तर वर्गात आपण सर्वांपेक्षा मागे आहोत या भावनेतून शाळा सोडत असते. (शाळा सोडण्यास मूल स्वतः कारणीभूत असेल तर..) म्हणजेच मूल नापास केल्यामुळे नव्हे तर येत नसताना त्याला पुढील वर्गात जास्त बुद्धीमत्तेच्या मुलांबरोबर बसवून त्याचा वारंवार अपमान होत असल्याने शाळा सोडते.(कारण वर्गात त्याच्यापेक्षा सर्वजण जास्त हुशार असतात व त्यामुळे नकळत त्याची कुचंबना होत असते.)
  3. यावरून नापास करणे म्हणजे बालकाला शिक्षा देणे असा अर्थ होत नसून त्याला विकासाची पुन्हा नवीन संधी उपलब्द करून देणे असा अर्थ होतो. ( आपण धावण्याच्या शर्यतीचे उदाहरण घेऊ. खूप मागे पडलेला विद्यार्थी एकतर दुप्पट वेगाने धावला पाहीजे किंवा दुसरे सगळ्यांनी त्याच्यापेक्षा निमपट वेगाने धावले पाहिजेत तरच तो सर्वांबरोबर येऊ शकतो. आणि तसे होणे शक्य नाही कारण तो दुप्पट वेगाने धाऊ शकत असेल तर मागे पडलाच नसता आणि इतरांचा वेग कमी करण्याचा आपल्याला हक्कच नसतो. त्यासाठी तिसरा सर्वोत्तम उपाय म्हणजे या स्पर्धेतील हार पचवून नवीन स्पर्धेत नव्या जोमाने, सर्वांच्या सोबत, समान बुद्धीमत्तेच्या स्पर्धकांसह, व समान संधी मिळवून, जुन्या अनुभवांसह, सुरवात करायची व विजय खेचून आणायचा)
  4. पुढचा मुद्दा म्हणजे गुणवत्ता पाठ्यपुस्तकांमध्येच असते असे नसून विद्यार्थ्याला अजून काही येत असते त्याचा विचार करून त्या क्षेत्रातील त्याची प्रगती पाहून रूची पाहून पास करणे. असे केल्यास एक धोका संभवतो तो असा कि, एखादा विद्यार्थी वाचता लिहिता अगर अंकगणित लेखी न समजताही पास होऊ शकतो .कारण उपजत बुद्धीच्या व काही सुप्त गुणांचा विकास झाल्याने विविध उपक्रमातील सहभाग घेऊन, गोष्टी गाणी भाषणे खेळ इ. च्या सह्याने तो मार्क मिळवू शकतो. तसेच परिक्षेतही चार पाच  मार्क काही कौशल्याने  वाचता न येणारी प्राप्त करू शकतो. त्यामुळे अशी पिढी तयार होईल की वाचन व पायाभूत क्रिया न येता ही पिढी इ. आठवी पास झालेली असेल. पुन्हा शिक्षकांचीच नाचक्की होईल.
             शेवटी मला इतकेच म्हणावयाचे आहे कि, विद्यार्थ्याला त्याच्या वर्गाच्या निश्चित अध्ययन क्षमतेच्या(वाचन लेखन अंकगणित) 35 टक्के जर अध्ययन क्षमता प्राप्त नसतील तर त्या विद्यार्थ्याला पास करणे हेच त्याच्या आयुष्यात अत्यंत धोकादायक ठरणार असून नापास करणे हे त्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.
           सदरचा लेख हा स्वताहून अभ्यासात मागे असणार्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात असून जर घरगुती कारणामुळे जर बुद्धीमान मुलगा गैरहजेरीने नापास होत असेल तर त्याला इतर कौशल्यातून पास केल्यास तो पुढील शिक्षण उत्तमरित्या घेऊ शकतो . मी वयानुरूप प्रवेश दिलेले तीनही विद्यार्थ्यी आज व्यवस्थित शिक्षण घेत आहेत मात्र ते गैहरजरीमुळे नापास होणार होते.
           पास किंवा नापास करणे  हे महत्वाचे नसून  तसे करण्यापाठीमागचा उद्देश महत्तवाचा असतो.

Saturday, September 19, 2015

"प्रगत शै महाराष्ट्र" कार्यक्रम अत्यंत चांगला असून त्याला "आभासी गुणवत्ता" नावाच्या महाभयानक रोगापासून दूर ठेवायचे असल्यास खालील बाबीवर चर्चा होणे व निर्णायक मत प्रदर्शन होणे गरजेचं आहे.
आभासी गुणवत्ता म्हणजे आजपर्यंत घडत आल्याप्रमाणे पुर्व चाचणी कडक घ्यायची व उत्तर चाचणी मध्ये थोड सैल सोडायचं म्हणजे बरोबर कागदावर गुणवत्ता विकास दिसून येतो.
आता सदर उपक्रम तीन वर्षे चालणारी प्रक्रिया असल्याने आभासी गुणवत्तेवर नक्की आळा बसेल, मात्र तरीही आणखी एका गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचं आहे. कि तीन वर्ष तो वर्ग एकाच शिक्षकाकडे राहण्याची दक्षता (अवघड आहे पण शक्य असेल तेवढी) घ्यावी. नाहीतर problem निर्माण होतो तो असा कि
उदाहरणार्थ, सन २०१५-१६ मध्ये इ. ५वी चा वर्गाची गुणवत्ता वर्षा अखेरीस जर ८०% निश्चित करण्यात आली असेल आणि ६ वी च्या वर्षारंभाला वर्गशिक्षक बदलला असल्यास नवीन वर्गशिक्षकांनी जर पुन्हा मूल्यमापन करून सदर वर्गाची गुणवत्ता ७०% दाखवली ( दाखले जाणे, नवीन दाखले येणे, कोणीही येऊन पहा सध्या माझ्या वर्गाची गुणवत्ता ७०% एवढीच आहे नंतर वर्षा अखेर मी 80% करून दाखवतो वैगेरे कारण देऊन)
    आणि या क्षणी जर ७०% गुणवत्ता मान्य करण्यात आली तर मात्र
"आभासी गुणवत्ता " नावाच्या रोगाची लागण झालीच म्हणून समझा.
" एकही मुलगा अप्रगत नसणा-या शिक्षकाचा सन्मान करणे" यामध्येही एक problem निर्माण होतो तो असा कि,
माझ्या वर्गात (५वी) यावर्षी ७ मुले अप्रगत असून त्यापैकी वर्षा अखेरीस मी ५ मुले प्रगत केली. तरीही २ मुले अप्रगत राहिल्याने ५वी चा वर्ग या वर्षी संपूर्ण प्रगत दिसणार नाही (१००%गुणवत्ता दिसणार नाही). पण पुढील वर्षी वर्गशिक्षक बदलून ६वी मध्ये मात्र फक्त २ च विद्यार्थी अप्रगत असणार व हे दोन विद्यार्थी प्रगत केले कि त्याचा संपूर्ण वर्ग प्रगत होणार (१००%गुणवत्ता)
म्हणजेच ५ विद्यार्थी प्रगत करणा-या शिक्षकाला १००% गुणवत्तेचा सन्मान मिळणार नाही फक्त २ विद्यार्थी प्रगत करणा-या शिक्षकाला १००% गुणवत्तेचा सन्मान मिळेल.
(येथे "फळाची आशा न धरता काम करणारे" , "भविष्य चा विचार न करता वर्तमान मधे फक्त चांगले काम करणारे" , "वर्तमान से भविष्य बनता है, भविष्य से वर्तमान नही," असा विचार करणारे शिक्षकांचा विचार केलेला नाही. कारण असा भग्वतगितेतील कर्मयोग जाणनारे महान लोक कमी असतात. व भविष्याचा विचार करून वर्तमान जगणारेच जास्त असतात.)
आपणाला व्यवस्था सुधारून प्रगत शै महाराष्ट्र घडवायचा असल्यास सर्व बाजूंनी विचार करायला हवा.
तात्पर्य इतकेच कि, एकही मुलगा अप्रगत नसणारा वर्गशिक्षक उत्कृष्ट आहेच त्याचबरोबर जास्तीत जास्त मुले प्रगत करणारा ही उत्तम आहे.
नाहीतर आभासी गुणवत्तेचा वास आलाच म्हणून समजा.
त्याचप्रमाणे शाळेतील, पालकांची, शिक्षकांची, तसेच इतर आपातकालीन परिस्थिति, हे सर्व प्रतिकूल असतानाही १ मुलगा प्रगत करून दाखविने व वरील सर्व परिस्थिति अनुकूल असताना २ मुले प्रगत करून दाखवने यामध्ये बराच फरक असतो हेही लक्षात घ्यावे लागेल. कारण नदीकिनारी १० झाडापेक्षा वाळवंटात १ झाड लावणारा श्रेष्ठ असतो.
कर्मण्ये वादी कार्यस्ते मा फलेशू कदाचन -