कोणत्याही वर्गात अध्यापन करीत असताना ज्या विद्यार्थ्यांना लवकर समजते ते
लवकर पुढे जातात. व कमी वेगाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिकविताना हे
हुशार विद्यार्थी दंगा करत अगर दुसरे काहीतरी अर्थहीन करत बसतात. ही
एकस्तरी अध्यापनाची मर्यादा आहे.
येथे दोन प्रकारच्या मुलांचा विचार करूया अ गट ( हुशार विद्यार्थी ) , ब गट ( मध्यम विद्यार्थी)
येथे दोन प्रकारच्या मुलांचा विचार करूया अ गट ( हुशार विद्यार्थी ) , ब गट ( मध्यम विद्यार्थी)
- अ गटाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो कारण कमी वेगाच्या मुलांना सोबत घेऊन जाण्यासाठी शिक्षक जेव्हा पुनराध्यापन करतो त्यावेळी या अ गटातील हुशार विद्यार्थ्यांच्या जीवनातील बहुमुल्य वेळेचा हवा तेवढा सदुपयोग होत नाही. कारण ते हुशार असले तरी त्यांना त्यांच्या वेगाने शिक्षण मिळत नाही , व इतरांसाठी त्यांना थांबावे लागते. पण त्याचवेळी इतर देशातील (इतर ठिकाणची ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या वेगाप्रमाणे शिक्षण मिळते ) त्यांच्या बुद्धीमत्तेची मुले त्याच वेगाने पुढे निघून जातात. हा हुशार मुलांवर होणारा एक प्रकारचा अन्यायच आहे. कारण ते ही भारताचे नागरीक आहेत . शिक्षकांना जो पगार मिळतो तो प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार शिक्षण देण्यासाठी .
- त्याचप्रमाणे जर अ गटाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वेगाप्रमाणे वेळ द्यायचा म्हटल्यास ब गटाचे विद्यार्थी मागे राहतील कारण त्यांना दोन वेळा मार्गदर्शन देण्याची गरज असते , नव्हे तो त्यांचा हक्कच आहे. कारण शिक्षण घेण्यासाठी व अडचणी दूर होण्यासाठी बालक शाळेेत येते.आणि त्याला हवे तेवढे मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळालेेच पाहिजे या मध्ये त्याच्या गतीनुसार त्याला शिकता आले पाहीजे.
- यासाठी बहुस्तरीय अध्यापन ही काळाची गरज बनली आहेे.
- शिक्षकाला एकाच वेळी दोन वेगवेळे स्तरांवरील पाठ शिकविता आले पाहीजेत. (काही वेळा
3,4 सुध्दा) - त्यासाठी शिक्षकांनी गट पध्दतीचा वापर करावा.
- प्रत्येक गटाला मार्गदर्शन करताना इतर गटांच्या जीवनातील अध्ययन करण्याचा बहुमुल्य वेळ वाया जाऊ नये यासाठी इतर गटांना त्यांच्या गतीनुसार कामात (अध्ययनात) ठेवता आले पाहीजे.
- यासाठी कृतियुक्त शै. साधने, कार्डे , संगणक , मोबाईल, अॅॅप्स, इ. साधने शिक्षकाला सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचा पुरेपुर वापर करून घ्यावा.
- गटअध्यापन व विविध साधनांचा स्वतः वापर करून मुले शिकतात, व शिक्षकाला प्रत्येक गटातून मुले इतक्या शंका विचारतात कि फक्त त्यांच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी शिक्षकाला 11 ते 5 वेळ द्यावा लागतो. हेच ज्ञानरचनावादाचे मूळ आहे. व यातूनच मुले आपल्या गतीने शिकत जातात.
No comments:
Post a Comment