शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये विद्यार्थ्याला नापास करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सरकार आत्ता नापास करण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहे. नापास करण्याच्या जुन्या पध्दतीला काही सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. म्हणून केंद्रानेे याबाबतीत राज्य सरकारांचे मत मागविले आहे. सदर ब्लाॅग मधून एक शिक्षक म्हणून मी माझे मत प्रदर्शित करत आहे.
मुलास नापास करू नये या मताचा आदर करताना कोणताही शिक्षक खालील गोष्टींचा विचार करतो.
- नापास होणे ही मुलास अपमान कारक बाब असते. त्यामुळेे त्याचा अात्मविश्वास कमी होतो.
- त्यामुळे ती हळू हळू शाळा सोडून देतात.
- पास 0होण्यासाठी फक्त 40 टक्के किमान अध्ययन क्षमता अपेक्षित असतात, व त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जन्मसिद्ध असतातच.
- नापास करणे म्हणजे बालाकाला शिक्षा देण्यासारखे आहे.
- गुणवत्ता म्हणजे केवळ पाठ्यपुस्तके नव्हे , त्याचा परिघ खूप मोठा आहे. (1 ते 100 अंक वाचता न येणारा निरक्षरही मोठे हिशोब करतो मग त्या विद्यार्थ्याला त्या हिशोबाच्या क्षमता येत असणारच. इ.
- आत्मविश्वास कमी होतो , अपमान होतो या कारणास्तव सत्याचा स्विकार केला नाही तर असत्य हेच सत्य आहे असे मुलास वाटू लागते. म्हणजे मुलाला तुला काय काय येत नाही याची जाणीव करून दिली नाही तर अजून त्याला किती प्रगती करायची आहे व तो जगाच्या तुलनेत कोठे आहे . हे समजणारच नाही. चूक समजल्याशिवाय त्यात सुधारणा होणे शक्य नसते. कारण आपण चुकीलाच बरोबर म्हणून मान्यता दिलेली असते.
- मुले नापास केल्यामुळे शाळा सोडून देतात यावर विचार केल्यास तितकेसे खरे वाटत नाही. कारण मुलाला जेव्हा आपल्याला शाळेत काही येत नाही असे वाटते तेव्हा त्याला शाळा सोडून येणारे दुसरे काहीतरी करावे असे वाटते. म्हणजेच मूल नापास होण्याने शाळा सोडत नाही तर वर्गात आपण सर्वांपेक्षा मागे आहोत या भावनेतून शाळा सोडत असते. (शाळा सोडण्यास मूल स्वतः कारणीभूत असेल तर..) म्हणजेच मूल नापास केल्यामुळे नव्हे तर येत नसताना त्याला पुढील वर्गात जास्त बुद्धीमत्तेच्या मुलांबरोबर बसवून त्याचा वारंवार अपमान होत असल्याने शाळा सोडते.(कारण वर्गात त्याच्यापेक्षा सर्वजण जास्त हुशार असतात व त्यामुळे नकळत त्याची कुचंबना होत असते.)
- यावरून नापास करणे म्हणजे बालकाला शिक्षा देणे असा अर्थ होत नसून त्याला विकासाची पुन्हा नवीन संधी उपलब्द करून देणे असा अर्थ होतो. ( आपण धावण्याच्या शर्यतीचे उदाहरण घेऊ. खूप मागे पडलेला विद्यार्थी एकतर दुप्पट वेगाने धावला पाहीजे किंवा दुसरे सगळ्यांनी त्याच्यापेक्षा निमपट वेगाने धावले पाहिजेत तरच तो सर्वांबरोबर येऊ शकतो. आणि तसे होणे शक्य नाही कारण तो दुप्पट वेगाने धाऊ शकत असेल तर मागे पडलाच नसता आणि इतरांचा वेग कमी करण्याचा आपल्याला हक्कच नसतो. त्यासाठी तिसरा सर्वोत्तम उपाय म्हणजे या स्पर्धेतील हार पचवून नवीन स्पर्धेत नव्या जोमाने, सर्वांच्या सोबत, समान बुद्धीमत्तेच्या स्पर्धकांसह, व समान संधी मिळवून, जुन्या अनुभवांसह, सुरवात करायची व विजय खेचून आणायचा)
- पुढचा मुद्दा म्हणजे गुणवत्ता पाठ्यपुस्तकांमध्येच असते असे नसून विद्यार्थ्याला अजून काही येत असते त्याचा विचार करून त्या क्षेत्रातील त्याची प्रगती पाहून रूची पाहून पास करणे. असे केल्यास एक धोका संभवतो तो असा कि, एखादा विद्यार्थी वाचता लिहिता अगर अंकगणित लेखी न समजताही पास होऊ शकतो .कारण उपजत बुद्धीच्या व काही सुप्त गुणांचा विकास झाल्याने विविध उपक्रमातील सहभाग घेऊन, गोष्टी गाणी भाषणे खेळ इ. च्या सह्याने तो मार्क मिळवू शकतो. तसेच परिक्षेतही चार पाच मार्क काही कौशल्याने वाचता न येणारी प्राप्त करू शकतो. त्यामुळे अशी पिढी तयार होईल की वाचन व पायाभूत क्रिया न येता ही पिढी इ. आठवी पास झालेली असेल. पुन्हा शिक्षकांचीच नाचक्की होईल.
सदरचा लेख हा स्वताहून अभ्यासात मागे असणार्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात असून जर घरगुती कारणामुळे जर बुद्धीमान मुलगा गैरहजेरीने नापास होत असेल तर त्याला इतर कौशल्यातून पास केल्यास तो पुढील शिक्षण उत्तमरित्या घेऊ शकतो . मी वयानुरूप प्रवेश दिलेले तीनही विद्यार्थ्यी आज व्यवस्थित शिक्षण घेत आहेत मात्र ते गैहरजरीमुळे नापास होणार होते.
पास किंवा नापास करणे हे महत्वाचे नसून तसे करण्यापाठीमागचा उद्देश महत्तवाचा असतो.
No comments:
Post a Comment